१३८ गूळ खाणे सोडून दे
मुलाला गूळ खाण्याची खूप सवय होती . व्यसनच म्हणा ना ! कितीही सांगितले तरी तो ऐकायचा नाही . आईने स्वतः किती प्रयत्न केले . शिक्षकांना, गावाच्या लोकांना सांगायला सांगितले . सांगितले तेवढाच वेळ . पुनः ये रे माझ्या मागल्या . आईने त्याला वैद्याकडे न्यायचे ठरविले .
एके दिवशी आई मुलाला घेऊन वैद्याकडे गेली . वैद्याने चौकशी केली . येण्याचे कारण विचारले . आईने आपल्या येण्याचे कारण सांगितले . मुलाच्या गूळ खाण्याच्या वाईट सवयीविशी तक्रार केली . मुलाला काहीतरी सांगण्याची विनंती केली . वैद्य आपले काम करीत राहिला . त्याने त्यांना घरी जायला सांगितले .
मुलाची सवय चालू होती . आईने पुन्हा वैद्याकडे जायचे ठरविले . आणि
मुलासमवेत ती गेलीही . वैद्याला तिने पुनः विनंती केली . वैद्य काही बोलला
नाही .
महिन्याभराने ती परत गेली . वैद्याने मुलाला आपल्या समोर बसविले . तो म्हणाला, " मुला, तू गूळ खातोस . खातोस ते ठीक आहे . पण तू खूप खातोस . खूप खाणे हे बरोबर नाही . हि वाईट सवय आहे . गूळ खाणे सोडून दे . "
आई घरी आली . आणि काय आश्चर्य ! त्या दिवसापासून मुलाने गूळ खाणे सोडून दिले . काही दिवसांनी आई त्या वैद्याकडे गेली . ती म्हणाली, " महाराज, तुमच्या साध्या दोनचार वाक्यांनी माझ्या मुलाची दीर्घ काळाची वाईट सवय सहज निघून गेली . मला आश्चर्य वाटते त्या गोष्टीचे की, ती साधी चारदोन वाक्ये सांगायला तुम्ही मला तीन वेळा का बोलाविले ? "
मंद स्मित करीत वैद्य म्हणाले, " ते दोन महिने मला माझी गूळ खाण्याची सवय मोडायला लागले . "