आज श्रीरामनवमी . प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिन. आदर्शाचे हे मूर्तिमंत प्रतीक. राजा
कसा असावा हे त्यांनी आपल्या जीवन चरित्राने दाखवून दिले. आजच्या अगदी आजच्या सन २०१५ च्या काळातही हे दैवी व्यक्तिमत्व आपल्याला वाट दाखविते.
कसा असावा हे त्यांनी आपल्या जीवन चरित्राने दाखवून दिले. आजच्या अगदी आजच्या सन २०१५ च्या काळातही हे दैवी व्यक्तिमत्व आपल्याला वाट दाखविते.
राजा आपल्या प्रजेसाठी काय करू शकतो हे रामांनी स्वतः जगून दाखविले. राजा व्हायचे
ते देण्यासाठी. राजा व्हायचे ते त्यागासाठी. राजा व्हायचे ते दानाकरिता दोन्ही हात कमी पडावेत यासाठी . हरिश्चंद्र , शिबी, जनक या सर्वांवर उठून दिसणारे राम हे लोभस व्यक्तिमत्व याकरिताच आहे . रामचरित मानसात छान श्लोक आहे.
स्नेहं दया च सौख्यं च यदि वा जानकीमपि |
आराधनाय लोकानां मुन्च्यतो नास्ति मे व्यथा ||
प्रजेच्या सुखासाठी कोणताही त्याग करण्यास मी दुख: मानणार नाही.
प्रेम, दया, सुख, इतकेच नव्हे तर वेळ आल्यास प्रत्यक्ष जानकीचाही त्याग करण्यास
मी मागेपुढे पाहणार नाही.
प्रभू श्रीरामांनी सीतेला आज्ञा दिली.
सीतेने अग्निदिव्य करायचे ठरविले.
पृथ्वीने सीतेला आपल्यात सामावून घेतले.
उर्मिला आपल्या महालात बसलेली होती.
रामाच्या एकटेपणावर काय करावे बरे !
उर्मिलेने एक प्रसिद्ध चित्रकार बोलावला.
त्याच्याकडून सीतेचे देखणे चित्र काढून घेतले.
हुबेहूब प्रतिसीता दिसत होती ती.
उर्मिल चित्र घेउन रामाच्या महालात गेली.
रामाला तिने चित्रावरील पडदा दूर करायची विनंती केली.
रामाने तस्विरीचे अनावरण केले.
आणि क्षणार्धात राम आपल्यातच हरवले.
काही वेळ जाऊ दिल्यावर उर्मिलेने रामाला विचारले,
" चित्र कसे आहे. "
डोळ्यात अश्रू भरलेले श्रीराम म्हणाले, " सीता दिसल्याबरोबर मी तिच्या आठवणीत हरवून गेलो.
चित्रातली सीता मला दिसलीच नाही. "