Friday, June 28, 2024

१००. काळाचा महिमा अगाध

                                                                      कथा विवेकानंद - १००

     संसाराचे गणित तसे वेगळ्याच प्रकारचे आहे . सबल माणसे दुर्बलांना त्रास देत असतात . त्रास देण्याची हि प्रक्रिया सतत चालत असते . दुबळा माणूस सहन करीत जातो . मात्र हळूहळू त्रास सहन करता करता त्याची सहनशक्ती वाढत जाते . आणि इकडे त्रास देणाऱ्याची कमी कमी होत जाते . एक वेळ अशी येते की ती त्रास देणारी व्यक्तीच त्रास सहन करणाऱ्याच्या आश्रयाला येते .पश्चात्तापाने पोळण्यासाठी . 
     नरेंद्रच्या बाबतीत असेच नाही का झाले ?  विश्वनाथ दत्ताचे निधन झाले . भुवनेश्वरीदेविंवर आकाश कोसळले. पदरात छोटी छोटी मुले.खायचे काय ? संकटे साथीने येत असतात . नरेंद्राची काकी ज्ञानदासुंदरी नावाप्रमाणे दत्त म्हणून पुढे उभी राहिली . कोर्टाचा दावा लावला . भुवनेश्वरीदेविंना मुलांबाळासह घराबाहेर काढण्याचा विडाच या विक्षिप्त बाईने   उचलला . 
     पण काळाचा महिमा अगाध असतो. खटला चालविता चालविता नरेंद्रच्या या छोट्या काकीला पुढे इतकी गरिबी आली की म्हातारपणात मदतीसाठी तिला विवेकानन्दांसमोर हात पसरावा लागला .