कथा विवेकानंद - ११६
भुवनेश्वरीदेवी नित्यपूजा आटोपून ध्यान करायला बसली . मनाच्या एका कुठल्यातरी कोपऱ्यात इच्छा होतीच ' मला तेजस्वी पुत्र व्हावा ' जबरदस्त इच्छा असली ना की, ती पुरी होत असते .
आणि त्या दिवशी तसे झालेही . ध्यान करता करता भुवनेश्वरी देवीसमोर साक्षात देवाधिदेव महादेव उभे राहिले . हळूहळू त्यांनी बालरूप घेतले आणि ते देवींच्या अंकावर येउन बसले . त्रिभुवनेश्वरि देवींची समाधी भंग पावली . मात्र एका दिव्य आकांक्षेला जन्म देऊन .
पौष कृष्ण सप्तमी १२ जानेवारी १८६३ . मकरसंक्रांतीचे पुण्यपर्व . सकाळी सहा वाजून तेहेतीस मिनिटांनी त्रिभूवनेश्वरीदेविनी तेजः पुंज बालरत्नाला जन्म दिला . भगवान महादेवाचा प्रसाद म्हणून साहजिकच त्याचे नाव ठेवले गेले ' वीरेश्वर ' आईचा लाडका ' बिले '

No comments:
Post a Comment