१२६ इंद्र परत स्वर्गाचा राजा बनला
देवांचा राजा इंद्र.
त्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत.
इंद्राला सहस्त्राक्ष, हजार डोळे आहेत असे म्हणतात.
याचा अर्थ त्याला सगळे माहित होत असते असा आहे.
म्हणूनच तो तिन्ही लोकांचा स्वामी, जगाचा राजा.
आपल्या प्रचंड तपामुळे ययातीला इंद्रपद मिळाले.
सारी सुखे हात जोडून समोर उभी राहिली.
काही दिवस असेच गेले.
इंद्राला आता आपल्या इंद्रपदाची आठवण होऊ लागली.
काय करावे बरे !
इंद्रच तो ! उपाय काढल्याविना थोडाच राहील.
इंद्राने स्तुतीपाठकांचा एक जथाच स्वर्गात पाठवून दिला.
यथावकाश त्यांनी आपले जाळे विणायला सुरुवात केली.
ययाती केवढा मोठा, पराक्रमी, सुंदर, महान !
स्तुतीच्या वर्षावात ययाती चिंब चिंब होऊ लागला.
ययातीला गर्व चढू लागला.
कोणतीही गोष्ट जितकी घोटावी तितकी चढत जाते.
हळूहळू त्याने आत्मस्तुती करायला सुरुवात केली.
धर्मराजाने आत्मस्तुतीला आत्महत्येच्या बरोबरीचे पाप मानले आहे.
ययातीचे तेज कमी होऊ लागले.
त्याने पुढची पायरी गाठली.
परनिन्देला आरंभ केला.
परिणाम स्पष्ट होता.
ययातीचे तेज इंद्रापेक्षा कमी झाले.
ययाती सत्ताच्युत झाला.
इंद्र परत स्वर्गाचा राजा बनला.

No comments:
Post a Comment