१३९ गुरुपौर्णिमा
अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन आणि माझ्या प्रिय बंधू भगिनीनो . आज गुरुपौर्णिमा . त्यानिमित्ताने मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावेत अशी माझी नम्र विनंती .
गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या भारतात प्राचीन काळापासून साजरा होत आला आहे . गुरु म्हणजे आपल्याला ज्ञान देणारा, शिकविणारा . त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा .
जगाचा आद्य गुरु म्हणजे भगवान वेद व्यास . व्यासांनी ज्ञानाचे भांडार जगाला खुले केले . त्यांनी त्यासाठी अखंड प्रवास केला, खूप कष्ट सहन केले, प्रचंड माहिती जमविली . चार वेद, अठरा पुराणे, महाभारत आणि भागवत एवढे मोठे साहित्य भांडार व्यासांनी आमच्यासाठी दिले . म्हणून म्हणतात ' व्यासोच्छिष्ठं जगत् सर्वम् ' आज त्यांचे स्मरण करण्याचा दिवस .
गुरु म्हणजे आपल्याला दिशा दाखविणारा . चांगल्या वाटेने नेणारा . आपल्या संस्कृतीत यांची अनेक उदाहरणे आहेत . ऋषी विश्वामित्र आणि राजा राम, गुरु सांदिपनी आणि शिष्य कृष्ण, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, आमच्या देशातील गुरुशिष्य परंपरेला या माणसांनी महान बनविले आहे .
संध्याकाळची वेळ होती . खूप पाऊस पडत होता . नदीचे पाणी वाढायला लागले. हळूहळू ते बांधाला, त्याच्या वरच्या टोकाला टेकले . बांध ओलांडून ते शेतात यायला लागले . आरुणी विचार करू लागला . बांध फुटला तर पाणी शेतात घुसेल . सगळे शेत वाहून जाईल . मग आपण खाणार काय ? आता काय करावे बरे ? त्याने बांधावर माती घालयला सुरुवात केली . पण वेगाने वाहणारे पाणी त्या मातीने थोडेच थांबेल ? घातलेली माती वाहून जाऊ लागली . आरुणीने क्षणभर विचार केला आणि त्या बांधावर स्वतः ला झोकून दिले .
No comments:
Post a Comment