कथा विवेकानंद - ११३
संकट हे नेहमीच दुसऱ्या संकटाच्या हातात हात घालून येत असते . एका परीने माणसाची परीक्षाच ती . नरेंद्र आर्थिक समस्येत बुडालेला . पदवी हातात . पण नोकरी नाही . त्या काळीही आजच्या सारखीच परिस्थिती .
चाम्पाताला येथे विद्यासागरांनी शाळा सुरु केली होती . त्या शाळेला मुख्याध्यापकाची आवश्यकता होती . महेंद्रनाथांच्या नजरेत नरेंद्र आला . त्यानी प्रयत्न केले आणि नरेंद्र मुख्याध्यापक म्हणून तेथे काम करू लागला .
त्या शाळेचे सचिव होते विद्यासागरांचे जावई . नरेंद्र त्याच्या डोळ्यात खुपू लागला . त्यांनी पडद्यामागे हालचाली केल्या . नरेंद्राला राजीनामा द्यावा लागला . कारण होते, नववी व दहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे केलेला अर्ज . ' नवीन मुख्याध्यापकांना शिकविता येत नाही . '
ज्या माणसाला सारे विश्व डोक्यावर घेऊन नाचले किंवा जो आज सुद्धा युथ आयकोन आहे त्याच्या बाबतीत घडविलेले एक कारस्थान .

No comments:
Post a Comment