१२१ आणि सहकार भांडाराची दृष्ट निघाली
सकाळचा प्रसंग . सामान घेण्यासाठी सहकार भांडारात गेलो होतो . मला पाहिजे ते सामान घेऊन पैसे देण्यासाठी रांगेत उभा राहिलो. माझ्या पुढे एक बाई होती. तिच्या सामानाची किंमत करण्याचे काम सुरु होते .
किंमत करता करता रोखीने मिठाची पिशवी उचलली. ती किंमत बघतेय तोवर त्या पिशवीतून मिठाची धार सुरु झाली . रोखीचे आसन, गणनयंत्र, पैसॆ आणि स्वतः ती रोखी मिठाने शुचिर्भूत झाली.
रोखीचे ताडताड वाक्ताडन सुरु झाले . आगीत लाह्या तडतडाव्यात तशी तिची मुक्ताफळे उसळू लागली . ' दिसत नाही का ? फुटकी पिशवी कशाला आणली ? कुठून कुठून लोक येतात . '
ती बाई बापडी गप्प बसली . पैसे देऊन चालू लागली . गलेलठ्ठ पगार खाऊन फुगलेली रोखी . तिला काळवेळ समजलाच नाही . गिऱ्हाईक देवता असते हे उमगलेच नाही . म्हणूनच असेल कदाचित, देवाने सहकार भांडाराची दृष्ट काढली .

No comments:
Post a Comment