१३६ प्रभातीचा दुर्गंध
अनेक लोक सिंगापूरला जातात.
गोव्यात आल्यावर तिथल्या स्वच्छतेवर ते छान बोलतात.
कुठेही कागद - कपटा, पिंक नाही. प्लास्टिक पिशव्या-बाटल्या नाहीत.
तुम्ही शहाळे खा. करवंटी मात्र विशिष्ट जागीच टाकली पाहिजे.
अस्वच्छतेला शिक्षा आहेच, त्याचबरोबर लोकही नाक मुरडताना दिसतील.
शहरात राहणाऱ्या एका महाभागाची कथा बघा !
सकाळची प्रसन्न वेळ. शांत मंद वारा. तसाच प्रकाशही !
हा सभ्य गृहस्थ आपल्या कुत्र्याला फिरविण्यासाठी बाहेर पडला.
सांखळीत अडकवलेली पांढऱ्या शुभ्र रंगाची विदेशी पामेरियन कुत्री.
रमत-गमत, दुसर्यांच्या गाडीच्या टायरावर मुत्रदान करीत मजेत चाललीय.
एक सुबकसे घर. घरासमोर सुंदर फुले फुललीत. सुवासही पसरलाय.
हे महाशय तिथे थाबलेत. घरमालकाच्या नकळत फुले काढताहेत.
साध्या, सरळ शब्दात सांगायचेय तर चोरताहेत. बरोबर ना ?
हे गृहस्थ फुले तोडताहेत म्हणजे घरमालकाचा परिमल, सुगंध नेताहेत.
आणि इकडे खाली जमिनीवर ती कुत्री एकाग्रचित्ते आपले प्रातर्विधी उरकते आहे.
थोड्याश्या अतिशयोक्त शब्दात म्हणजे घरमालकावर ह्गते आहे.
घरमालकाने दारी फुलझाडे लावली, प्रभाती घरात सुगंध येतो !
फुलांच्या चोरीसमवेत हा महाभाग मालकाला दुर्गंध देतो.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे !!!!!
No comments:
Post a Comment