१३३ साधूने जे केले ते चूक की बरोबर ?
माणसाच्या जिभेला हाड नसते.
म्हणून माणसाने त्या जिभेचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे.
कोठे बोलावे, काय बोलावे, याचे भान माणसाला असले पाहिजे.
मोठ्या स्थानावर असलेल्या माणसांना तर खूपच !
नाही तर जीभ घसरते, आणि मोठमोठे अनर्थ होतात.
एका तिस्कावर एक साधू तप करीत बसला होता.
अकस्मात एका बाजूने एक गाय धावत पळत आली,
आणि दुसऱ्या वाटेने निघून गेली.
आणि दुसऱ्या वाटेने निघून गेली.
पाच मिनिटांनी एक खाटिक हातात भलामोठा सुरा घेऊन आला.
तिस्कावर पोहोचताच तो गडबडला . गाय कोठे गेली बारे ?
तिस्कावर पोहोचताच तो गडबडला . गाय कोठे गेली बारे ?
त्याने साधूला गायीच्या जाण्याची दिशा विचारली.
साधूने डोळे उघडले, क्षणभर विचार केला आणि
भलत्याच दिशेकडे बोट दाखविले.
भलत्याच दिशेकडे बोट दाखविले.
खाटिक त्या दिशेने निघून गेला.
देवतास्वरूप गायीला वाचविण्यासाठी साधूने जे केले
ते चूक की बरोबर ?
मला वाटते . बरोबर !
ते चूक की बरोबर ?
मला वाटते . बरोबर !
No comments:
Post a Comment