१३५ मोठ्या प्रवासाला तो निघून गेलाय.
संध्याकाळची वेळ !
नेहमीप्रमाणे सगळी मुले शिकवणुकीसाठी जमली होती.
आपापला दिलेला अभ्यास मन लावून सगळी करीत होती.
गंगाधरशास्त्री मोठ्या लाकडी पेटीला टेकून बसले होते.
मुलांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करीत होते.
मधून मधून आपले डोळे ते बंद करीत.
शिकवणी संपली. मुले गंगाधरशास्त्रीकडे मघापासून पाहत होती.
त्यांच्या बरोबर नेहमी अभ्यासाला बसणारा दुदिराज आज दिसत नव्हता.
मुलांनी गुरुजीना विचारले, ' दुदिराज कुठे गेलाय ? '
गुरुजी गप्प बसले. त्यांनी डोळे मिटून घेतले.
मुलांनी पुन्हा विचारले.
गुरुजी म्हणाले, " माणसे जिथून परत येत नाहीत अशा मोठ्या
प्रवासाला तो निघून गेलाय. आत्ताच त्याला पोहोचवून मी आलोय. "
स्तंभित झालेली ती मुले गुरुजीना म्हणाली.
' आणि तुम्ही एक शब्दही न बोलता आमची शिकवणी घेतलीत ? '
गुरुजी म्हणाले, " बाळांनो तुम्ही किती दूरवरून चालत येता.
तुमचा आजचा दिवस वाया गेला असता ना ?
आणि हे दुःख आता मला नेहमीचेच आहे ना ? "
' शिष्येदिच्छा पराजयेत ' विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा मोठा करणाऱ्या शिक्षकांना,
माझ्या सगळ्या ज्ञात अज्ञात शिक्षकांना माझा साष्टांग नमस्कार.
OMG
ReplyDeleteOMG
ReplyDelete