१२९ त्यांना अंघोळीला गरम पाणी लागते
संघटना मोठी कधी होते ?
जेव्हा ती आपल्या कार्यकर्त्यांची काळजी घेते तेव्हा !
पहाटेची वेळ. ते चूल पेटविण्याचा प्रयत्न करीत होते.
प्रयत्नाअंती चूल पेटली. त्यांनी पाणी गरम करायला ठेवले.
ते चुलीत लाकडे सारीत होते. पाणी गरम होत होते.
त्यांची हि धडपड एक माणूस पहात होता.
' तुम्ही हे कशाला करता ? '
माणसाने विचारले ?
' तुम्हाला ठाऊक आहे का ? हि जी दक्षिणेकडची माणसे आहेत ना !
त्यांना अंघोळीला गरम पाणी लागते.
त्याची व्यवस्था म्हणून हे काम मी करीत आहे.
काही वेळाने अध्यक्ष पदाच्या आसनावर आसीन होणारे ते होते बाल गंगाधर टिळक.
उगाच का लोक त्यांना लोकमान्य टिळक म्हणत !
No comments:
Post a Comment