कथा विवेकानंद - ४९
स्वामी विवेकानंदांनी बेलूर मठाची स्थापना करायचे ठरविले . त्यासाठी जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरु झाले . अनेक संथाल मजूर काम करू लागले .
स्वामीजी त्यांच्या बरोबर बोलत, गप्पागोष्टी करीत . त्यांच्या सुखदुक्खाविषयी चर्चा करीत . त्या मजुरांमध्ये केष्टा नावाचा एक मजूर होता . तो स्वामीजींना खूप आवडे .
एके दिवशी स्वामीजींनी स्वतः भोजन तयार केले . त्या सर्व मजुरांना भरपूर अन पोटभर वाढले . स्वतः च्या हातांनी त्यांना वाढले . मजुरांनी तृप्तीचा ढेकर दिला . स्वामीजी प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये ईश्वराचा अनुभव करीत . त्यामुळे असे घडले .