कथा विवेकानंद - ४४
स्वामी विवेकानंद अमेरिकेला चालले होते . वाटेत केंटन या चीनी बंदरात बोट थांबली . तेथे बरीच सुंदर सुंदर मंदिरे होती . स्वामीजी व काही प्रवासी दुभाषांना घेऊन मंदिरे पाहण्यासाठी निघाले .
चीनमधील काही मंदिरात परकीय लोकांना प्रवेश नसतो . चुकून अशा एका मंदिरा जवळ ते जायला निघाले . परकीयांना बघताच गावांतील लोक लाठ्या काठ्या घेऊन धावत यायला लागले . ते आक्रमण बघताच सगळे धावायला लागले .
स्वामीजी मात्र दृढपणे उभे राहिले . त्यांनी दुभाषाला विचारले की , हिंदू साधूला चीनी भाषेत काय म्हणतात ?
दुभाषी म्हणाला , ' कबाच '
चीनी गावकरी जवळ येताच स्वामीजी ' कबाच, कबाच ' असे म्हणू लागले.
त्याबरोबर सगळ्यांनी आपापली शस्त्रे खाली टाकली आणि ते स्वामीजींना पाया पडू लागले . क्षमा मागू लागले .

No comments:
Post a Comment