कथा विवेकानंद - ४३
स्वामी विवेकानंद अमेरिकेला चालले होते . बोटीने प्रवास चालला होता . डेकवर अनेकांशी गप्पागोष्टी होत . स्वामीजी बहुश्रुत होतेच . शिवाय वादात हार न जाणारे .
एके दिवशी दोन पाद्री स्वमिजींशी वादविवाद घालायला आले . हिंदू व ख्रिश्चन धर्मातील गुणदोषांची चर्चा व्हायला लागली . स्वामीजींच्या लक्षात आले की, हिंदूंच्या दोषांची आणि ख्रिश्चनांच्या गुणांचीच चर्चा होतेय . लगेच त्यांनी बाजू पळटवली .
ख्रिश्चनावर गोळी येताच त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला . त्या मिशनरयानी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले . ते हिंदू धर्माची गलिच्छ शब्दात निंदा नालस्ती करू लागले .
स्वामीजी थोडा वेळ गप्प राहिले . मिशनरी कसेच थांबत नाही हे बघताच ते एकाच्या अंगावर धावून गेले . एकदम त्याला म्हणाले, ' आता यापुढे हिंदू धर्माबद्धल एक शब्द जरी बोलाल तर मी तुम्हाला उचलून समुद्रात फेकून देईन . ' स्वामीजींचा अवतार बघताच मिशनऱ्यांनी हळूच काढता पाय घेतला .

No comments:
Post a Comment