Sunday, May 12, 2013

४७ . स्वामीजींची करुणा

                         कथा विवेकानंद - ४७

     सर्वधर्मपरिषद झाली आणि स्वामीजी प्रसिद्ध व्यक्ती बनले . मोठमोठ्या लोकांकडून त्यांना भोजनाची निमंत्रणे येऊ लागली . हिंदू धर्माच्या प्रचारार्थ त्यांचा ते उपयोग करू लागले . 
     अनेक घरी ते जात . अत्यंत थाटामाटात त्यांचे स्वागत केले जाई . थोरामोठ्यांच्या भेटीगाठी, सुग्रास भोजन, ऐषारामी रहाण्याची सोय अशी त्यांची व्यवस्था केली जाई .   
     असेच एक दिवस ते झोपले होते . त्यांच्या मनात विचार आला . माझ्या भारतातील कोट्यावधी बांधव उपाशी पोटी असताना मी सुग्रास भोजन करू शकतो काय ? भारतीयांना रहायला  झोपडीही नसताना मी महालात सुखनैव राहू शकतो काय ? 
     स्वामीजी पलंगावरून खाली उतरले . साध्या जमिनीवर ते झोपले . भारतीयांच्या दशेचा विचार करता करता त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले . ते रडूं लागले . 

No comments:

Post a Comment