Wednesday, May 1, 2013

४२. इच्छा तिथे मार्ग !

                    कथा विवेकानंद - ४२  

     स्वामीजी भारत भ्रमण करीत करीत कन्याकुमारीला आले . त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले . सागरासमोर ते उभे राहिले . भारतमातेचे पदवंदन करणारा अथांग हिंदुसागर समोर उसळत होता . त्यांनी समोर बघितले. कन्याकुमारीने तपःश्चर्या केलेली शीला श्रीपादशीला समोर होती . 
     गेल्या अडीच वर्षात काय नाही पहिले ?  पारतंत्र्यात खितपत पडलेला देश . गरिबीमुळे अन्नान्न झालेले लोक . आपल्याच श्रीमंती धुंदीत मदमस्त असलेले श्रीमंत आणि राजेमहाराजे . अन कर्तव्यविन्मुख झालेले समाजधुरीण . 
     स्वामीजींनी नावाड्याला विनंती केली . त्या शिलेवर पोहोचवायला सांगितले . पण स्वामीजी संन्याशी . पैसे कोठून देणार ? नावाड्यांनी नकार दिला . इच्छा असते तिथे मार्ग असतोच . मोठी माणसे कधीही अडथळ्याना जुमानीत नसतात . त्यावर मात करून ती नेहमी पुढे जातात . आणि म्हणूनच ती महान बनतात .  स्वामीजींनी क्षणभर विचार केला . निर्णय पक्का केला . आणि त्या उधाणलेल्या सागरात उडी ठोकली . भारतमातेचे दर्शन घेण्यसाठी . 

No comments:

Post a Comment