कथा विवेकानंद - ४६
स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले . सर्वधर्मपरिषदेचा दिवस उजाडला . सहा हजार चोखंदळ श्रोत्यांचा समुदाय . काय बोलायचे ? काहीच लिहिलेले , टिपलेले नाही . मुद्दे नाहीत .
स्वामीजींच्या नावाचा पुकारा झाला . ते व्यासपीठावर गेले . समोर बघितले आणि क्षणभर घशाला कोरड पडली . डोळे मिटले गेले . गुरुजींचे ध्यान केले गेले . डोळे उघडले आणि . . . .
" अमेरिकेतील माझ्या बंधुंनो आणि भगिनिंनो ! . . . . "
पुढचे शब्द कोणाला ऐकू गेलेत ! सगळा प्रेक्षकवर्ग उठून उभा राहिला होता . टाळ्यांच्या गगनभेदी कडकडाटाने आसमंत दुमदुमत होता .
संयोजकांनी विनंती केली आणि टाळ्या थांबल्या . ' सभ्य स्त्री- पुरुषहो ' ची प्रथा स्वामीजींनी मोडली होती . विश्वबंधुत्वाची शिकवण कृतीतून दिली होती . सारे जग एक कुटुंब मानले होते . ' माझाच पंथ खरा ' हि सेमेटीक विटी एकाच प्रहाराने तुकडे तुकडे करून टाकली होती .
छोटेखानी तीन मिनिटांचे भाषण संपले . जो तो धावत होता . स्टेजवर अहं व्यासपीठावर, आधुनिक व्यासांचा पदस्पर्श करायला !

No comments:
Post a Comment