Friday, May 10, 2013

४५. ते ज्ञानसूर्य आहेत .

                         कथा विवेकानंद - ४५ 

     स्वामी विवेकानंद सर्वधर्मपरिषदेसाठी अमेरिकेला गेले . परिषदेला महिना होता . शिकागोत रहायचे म्हणजे प्रचंड खर्च . त्यातच स्वामीजींचे परीचय पत्र गहाळ झाले . त्यांनी बोस्टनला जायचा विचार केला . 
     स्वामीजी बोस्टनला गेले . खर्चात बचत व्हायला लागली . परिचय पत्रासाठी  त्यांनी प्राध्यापक जॉन राईट यांची भेट घेतली . स्वामीजी व जॉन राईट यांची चर्चा झाली . 
     थोड्याच वेळात स्वामीजींची श्रेष्ठता श्री . राईट यांच्या लक्षात आली . ते म्हणाले, ' तुमच्याकडे परिचयपत्र मागणे म्हणजे सूर्याला विचारणे, तुला प्रकाशण्याचा काय अधिकार आहे . ' 
     त्यांनी मोठ्या आनंदाने शिफारसपत्र लिहिले . त्या पत्रात ते लिहितात . ' सर्वधर्मपरिषदेसाठी मी स्वामीजींची शिफारस करीत आहे . नावनोंदणी करायची वेळ टळून गेली असली तरी स्वामीजींना प्रवेश द्यावा . ते ज्ञानसूर्य आहेत . अमेरिकेतील सारे विद्वान तराजूच्या एका पारड्यात आणि स्वामीजी दुसरया पारड्यात घातले तरीही स्वामीजींचे पारडे जड राहील . ' 

No comments:

Post a Comment