कथा विवेकानंद - ४८
स्वामी म्हणजे केवळ आध्यात्मिक चिंतन करणारे, पारलौकिकाचा विचार करणारे असा एक गैरसमज असतो . ते समाजाची चिंता करीत नाहीत असेही काहीजण समजतात .
स्वामी विवेकानंदांकडे काही समाजसेवक आले होते . बोलताना स्वामीजींच्या लक्षात आले की यातला एकजण पंजाबचा आहे . त्या दिवसात पंजाबात भीषण दुष्काळ पडलेला होता . लोक अन्नाला मोताद होत होते .
स्वामीजींनी चर्चेची गाडी पंजाबी रुळावर नेली . ते पंजाबातील दुष्काळाची चर्चा करू लागले . त्यावरील उपायांविषयी बोलू लागले .
पंजाबी गृहस्थ नाराज झाले . ' आध्यात्मिक काहीतरी ऐकायला मिळाले नाही ' असे त्यांनी स्पष्टपणे बोलूनही दाखविले .
स्वामिजींना राग आला. एकदम ते म्हणाले, ' माझ्या देशातील एक कुत्रे सुद्धा उपाशी असल्यास मला पहिली चिंता त्याची, मग अध्यात्माची . '

No comments:
Post a Comment