Tuesday, April 30, 2013

४१. मूर्ख माणसांशी गाठ

                        कथा विवेकानंद - ४१ 

     स्वामी विवेकानंद रेल्वेने प्रवास करीत होते . त्यांच्या समोर दोन ब्रिटीश माणसे बसली होती . पहिल्या वर्गाच्या डब्यात भारतीय माणसाने बसणे . त्यांना आवडले नव्हते . आमची गुलाम माणसे आमच्या बरोबर बसतात म्हणजे काय ? आणि त्यातही कहर म्हणजे हा हिंदू साधू !
     ब्रिटिशांचे एकमेकात बोलणे सुरु झाले . भारतीय, त्यांचे देव, हिंदू संन्यासी  यावर ते टीका करायला लागले . टीकेचे रुपांतर साहजिकच त्यांच्या स्वभावानुसार टिंगलीत झाले . स्वामीजी मात्र आपल्याला काही कळत नाही असे भासवीत त्यांचे बोलणे ऐकत होते . 
     पुढच्या स्टेशनवर गाडी थांबली . समोर स्टेशन मास्टर उभा होता . स्वामीजींनी त्यांना इंग्रजी भाषेत विनंती केली . ' मला थोडे पाणी मिळेल का प्यायला ? ' 
      समोर बसलेले ब्रिटीश प्रवासी सटपटले . आपण जे काही बोललो,    भारतीयांची निंदानालस्ती केली ती याला समजली . मग हा बोलला कसा नाही ? 
     उर्मटपणे ते स्वामीजींना म्हणाले, ' एवढा वेळ तुम्ही गप्प कसे राहिलात ? '
     स्वामीजी उत्तरले, " मूर्ख माणसांशी गाठ पडण्याचा हा काही माझा पहिलाच प्रसंग नाही ! " 

No comments:

Post a Comment