Thursday, April 25, 2013

३७. गरमागरम रोट्या

         कथा विवेकानंद - ३७
     कृतज्ञताभाव  हा स्वामीजींचा गुणविशेष होता . स्वामीजी अमेरिकेहून परतल्यावर अनेक ठिकाणी त्यांचे सत्कार झाले . अलवारला असाच सत्कार होता . स्वामीजींना अनेक मोठमोठ्या घरी भोजनाची आमंत्रणे येत होती .मात्र स्वामीजींनी पहिले आमंत्रण स्वीकारले ते एका म्हाताऱ्या आजीबाईचे . 
     स्वामीजींनी त्यांना निरोप पाठविला . ' गेल्या खेपेला केल्या होत्या अगदी तशाच गरमागरम रोट्या मला पाहिजेत . ' आजीबाईचा आनंद कशात वर्णावा ! त्यांनी आनंदाने जेवण करून स्वामीजींना वाढले . स्वामीजी जेवत असताना जेवणाची भरभरून स्तुती करीत होते . ' आईने अशाच रोट्या सात वर्षांपूर्वी मला अशाच प्रेमाने वाढल्या होत्या, जेव्हा मी एक अपरिचित साधू होतो.    

No comments:

Post a Comment