Wednesday, April 24, 2013

३६. मला बंदुकीची गरज नाही .

             कथा विवेकानंद - ३६ 
     स्वामी विवेकानंदांचा मुक्काम महाराजांकडे होता . महाराजांनी शिकारीचा बेत आखला . स्वामीजीही बरोबर निघाले . शिकार वाघाची होती . 
     महाराजांचा लवाजमा शिकारीच्या तयारीत गुंतला . ते वाघाला घेरायच्या तयारीला लागले . इकडे स्वामीजी एका झाडाखाली बसून चिंतन करायला लागले . अकस्मात समोर वाघ उभा . स्वामीजी वाघाला बघतायत . वाघ स्वामीजींना बघतोय . असाच थोडा वेळ निघून गेला . बघून बघून वाघ निघून गेला . 
     इकडे महाराजांना वाघ आल्याची बातमी समजली . ते धावत धावत आले . आपली बंदूक स्वामीजींना देऊ लागले . स्वामीजी म्हणाले, '' पशू साधूनां काहीही करीत नाहीत . साधूकडून अपाय होण्याची भीती नसल्याने ते निश्चिंत असतात . मला बंदुकीची गरज नाही . '' 
  

No comments:

Post a Comment