Monday, April 29, 2013

४० . फजिती करण्यासाठी आलेले अनुयायी बनले.

                        कथा विवेकानंद - ४० 

     दुसऱ्याची चेष्टा मस्करी करणे, थट्टा विनोद करणे ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची खासियत . स्वामीजींना भेटावे, त्यांच्याशी वादविवाद करावा . त्यांना हरवून मग भरपूर हसावे . 
     एकाने स्वामीजींना प्रश्न केला, ' साधू महाराज, देव म्हणजे काय ? '       कधीतरी शेरास सव्वाशेर भेटणारच . स्वामीजींच्या ध्यानात त्यांचा हेतू आला . त्यांनी विचारले, ' मुलांनो, उर्जा म्हणजे काय ? '
     मुलगा गडबडला . त्याने थातूर मातुर उत्तर दिले . स्वामीजी म्हणाले, ' नव्हे हे उत्तर बरोबर नव्हे . यात हे चुकलेय . ' 
     त्याला सावरण्यासाठी इतर खटपट करू लागले . स्वामीजी त्यांच्या उत्तरातील फोलपणा दाखवू लागले . विद्यार्थी गप्प झाले . स्वामीजींनी मग त्यांना उर्जा व देव दोन्ही संकल्पना समजावल्या . फजिती करण्यासाठी आलेले अनुयायी बनले होते .      

No comments:

Post a Comment