Wednesday, April 24, 2013

३५. जीवाशिवाची भेट

            कथा विवेकानंद - ३५ 
     माणसे मोठी, कीर्तिवान होताच आपल्या मित्रांना, ओळखीच्या माणसांना विसरतात असा अनुभव येतो . स्वामीजी भारताचे पदभ्रमण करीत होते . एक भगव्या कपड्यातला सामान्य संन्यासी देश फिरत होता . अलवारला मुक्कामात असताना त्यांचा मित्र होता रामस्नेही . मळकट कपड्यातला एक फकीर .
     विश्वदिग्विजय केला आणि विवेकानंद प्रसिद्ध झाले . अलवारला त्यांचा सत्कार होता . प्रचंड मोठी गर्दी जमली होती . विवेकानंद संन्यासी . असल्या सत्कारात त्यांचे कुठले लक्ष ! ते गर्दी बघत होते . 
     त्यांची नजर एकदम रामस्नेहीवर गेली . कळकट कपड्यात गर्दीच्या एका कडेला ते उभे होते . स्वामीजी व्यासपिठावरून  ओरडू लागले . ' रामस्नेही, रामस्नेही ' लोकांनी रामस्नेहींना वाट करून दिली . ते व्यासपीठावर आले . विवेकानंद त्यांना कडकडून मिठी मारत होते . जणू जीवाशिवाची भेट होत होती .  

No comments:

Post a Comment