कथा विवेकानंद - ३४
भारत भ्रमणाच्या काळात घडलेली गोष्ट . स्वामी वाराणसीला गेले होते . देवदर्शन करून स्वामी परतत होते . वाराणशीत माकडे भरपूर . देवदर्शनाला आलेल्या भक्तांनी दिलेल्या खाण्यामुळे तशी ती माजलेली . एखाद्या भक्ताने खायला दिले नाही तर बिनदिक्कत त्याच्या पिशवीत हात घालणारी . मिळेल ते खाणारी अथवा पिशवीच घेऊन पळणारी .
स्वामीजी चालत जात होते . अकस्मात ती माकडे स्वमिजीच्या मागे लागली . स्वामींनी हळूच आपली गती वाढविली . माकडे अधिकच जोराने मागे लागली . स्वामीजी पळू लागले . माकडेही धावू लागली . चावे घेऊ लागली . करायचे काय ?
एका साधूने बघितले . ते ओरडून इशारा करू लागले . ' थांबा, पळू नका . माकडांच्या दिशेने तोंड करा . त्यांच्या अंगावर धावून जा . '
स्वामीजींना लक्षात आले . ते थांबले . अर्धवृत केले . आणि अकस्मात माकडांच्या अंगावर धावून गेले . कुठली माकडे अन कुठले काय ! माकडे पळून गेली होती .

No comments:
Post a Comment