Friday, April 26, 2013

३८ . मूर्तीत परमेश्वर बघतात .

                             कथा विवेकानंद - ३८ 

     तो काळ ब्रिटीश राजवटीचा होता . राजे महाराजे, उच्चशिक्षित यांच्यावर इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव पडत होता . भारतीय ते चुकीचे आणि परकीय ते योग्य अशी धारणा बळावत चालली होती . 
     स्वामीजी महाराजांकडे असताना त्यांच्या लक्षात आले कि महाराजांचा देवावर, मुर्तीपूजेवर विश्वास नाही . इतकेच नव्हे तर ते मूर्तीपुजेची टिंगलही करतात . 
     एके दिवशी स्वामीजींनी एका अधिकाऱ्याला जवळ बोलाविले . समोर असलेली राजांची तस्वीर काढायला लावली . ते त्या अधिकाऱ्याला म्हणाले, ' या तस्वीरीवर थुंका पाहू . ' 
     अधिकारी गडबडला, इकडे तिकडे पाहू लागला . 
     स्वामीजी म्हणाले, ' अरे हि तर निर्जीव तस्वीर आहे . यात महाराज कुठे आहेत ? मात्र तू या तस्वीरीत महाराज बघत आहेस ! असेच सगळेजण मूर्तीत परमेश्वर बघत असतात .  '

No comments:

Post a Comment