कथा विवेकानंद - ३९
स्वामी विवेकानंद स्पष्टवक्ते होते . होणारा अपमान कधीही सहन करीत नसत . एकदा ते रेल्वेने प्रवास करीत होते . बरोबर खेतडी संस्थानचे दिवाण जगमोहनलाल होते . त्यांना निरोप देण्यासाठी एक बंगाली मित्रही डब्यात आला होता .
त्यांच्या गप्पा चालू होत्या इतक्यात एक इंग्रज तिकीट तपासनीस आला . बंगाली गृहस्थांना उद्धट भाषेत खाली उतरायला सांगू लागला . वास्तविक हे गृहस्थ रेल्वे कर्मचारी होते . आणि त्यामुळे त्यांना रेल्वेत यायची अनुमती होती . समजावले तरी तो तिकीट तपासनीस कसाच ऐकेना .
स्वामीजींनी तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तर तो ओरडलाच, ' तुम क्यों बोलते हो ? '
स्वामीजी एकदम संतापले . ' तुम कोणाला म्हणता ? हिंदीत आदराने ' आप ' म्हटले जाते हे ठाऊक नाही का तुम्हाला ? '
स्वामीजींच्या हल्ल्याने गांगरलेला तपासनीस म्हणाला, ' मला हिंदी फारसे येत नाही . मी या माणसाला . . . . '
' हिंदी तर तुम्हाला येतच नाही . तुमची इंग्रजीही येत नाहीशी दिसते . माणसाला नुसता मेन न म्हणता इंग्रजीत जंटलमेन म्हणतात . तुमचा क्रमांक आणि नाव द्या पाहू . मला वर तक्रार करायचीय . ' स्वामीजी म्हणाले . तिकीट तपासनीस पळाला हे आणि सांगायला पाहिजे .

No comments:
Post a Comment