३१ . विशाल वटवृक्ष हो !
नरेंद्र ध्यान करीत होता . ध्यान करता करता त्याला जाणवू लागले . आपण एका दिव्य तेजात विरघळून जात आहोत . त्याला काय करावे ते समजेना . तो एकदम ओरडला , ' मला हे काय होतंय ! '
नरेंद्र धाडदिशी जमिनीवर कोसळला . कोणाला काय झाले काहीच कळले नाही . सगळे शिष्य सभोवती जमा झाले . नरेंद्र निपचित पडलेला . श्वासोच्छ्वासही बंद .
सगळे धावत धावत स्वामी रामकृष्णाकडे गेले . घडलेला प्रसंग सांगू लागले . रामकृष्ण हसले . ते म्हणाले , ' असू दे . थोडा वेळ तसाच राहू दे त्याला . पुष्कळ दिवस मागे लागला होता यासाठी . '
थोड्या वेळाने नरेंद्र सावध झाला . काय घडले ते त्याला समजले . तो धावत गेला रामकृष्णाकडे . नमस्कार घातला .
' झाले ना मनासारखे ? ' रामकृष्ण म्हणाले .
नरेंद्र हसला . ' आणि काय इच्छा आहे ? '
' या निर्विकल्प समाधीचा लाभ नित्य व्हावा . ' नरेंद्र उद्गारला .
स्वामी रामकृष्ण किंचितसे रागावले , " नोरेन , असे स्वार्थी कसे बोलतोस ? अरे , आईने तुझ्यासाठी केवढे मोठाले काम योजले आहे . आणि तू केवळ तुझ्यासाठी मागणे मागतोस . सभोवताली बघ . समाजाकडे लक्ष दे . दुःख , दैन्य , दारिद्र्य दूर करायचेय तुला . यासाठीच तुझा जल्म झालाय रे ! या समाजाचे रक्षण करायचेय तुला ! विशाल वटवृक्ष हो !
मी नाही देणार तुला निर्विकल्प समाधीचा आनंद . आज मिळाला तेवढा आनंद पुरे . आता समाधी कुलुपबंद . तुझ्या अन्तःकाळी या कुलुपाची किल्ली मी तुला देईन . चल कामाला लाग आता .

No comments:
Post a Comment