२४. होय मी ईश्वराला पाहिले आहे .
१५ जानेवारी १८८२ चा दिवस . नरेंद्र सुरेन्द्रबाबुच्या घोडागाडीतून दक्षिणेश्वरला जायला निघाला . रामकृष्णाच्या खोलीत माणसांची दाटी होती . नरेंद्राला बघताच स्वामींनी त्याला भजन म्हणायचा आग्रह केला . नरेंद्र गाऊ लागला . रामकृष्णाची समाधी लागली . सगळे वातावरण भारुन गेले.
समाधी अवस्था उतरल्यावर स्वामी नरेनला बाजूच्या खोलीत घेऊन गेले . ते म्हणाले, " आपण देव आहांत . किती उशीर केलास रे यायला नारायणा ! "
नरेंद्राला ते वेड्यासारखे काहीतरी बोलतात असे वाटले .
आपल्या मनातील तो चिरपरिचित प्रश्न त्याने रामकृष्णांना विचारला, " आपण देव पाहिला आहे काय ? "
रामकृष्ण हसले . म्हणाले, " बाळा, होय मी ईश्वराला पाहिले आहे . आता मी तुला जसा पाहतो तसा किंबहुना त्यापेक्षा स्पष्ट मी त्याला पाहतो आहे. "
स्वामी रामकृष्णांनी नरेंद्राला मिठाई खाऊ घातली . त्याला म्हणाले, ' सवडीने एकदा पुन्हा ये . बोलू आपण . '

No comments:
Post a Comment