१५४ नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा !
मोठ्या धुमधडाक्यात कार्यक्रमाची तयारी चालली होती.
संस्कृतची जननी असलेल्या भारतातून मोठे पंडित येणार !
तीन दिवस त्यांच्या पांडित्याचा लाभ सर्वाना मिळणार !
प्राचीन देव वाणीत सगळे न्हाऊन जाणार !
सर्वांचा उत्साह उतू जात होता !
जर्मनी मधले मोठे शहर .
कार्यकर्ते पंडितांना आणायला विमानतळावर गेले.
सूट, बूट, टाय घातलेल्या व्यक्तीला पाहिल्यावर मनात किंचीतशी शंका डोकावली.
पण कदाचित युरोपातील थंडीमुळे असेल, कार्यकर्त्यांनी मनाला समजावले.
कार्यक्रम सुरु झाला. पाहुण्यांची भाषणाची वेळ आली.
संयोजकांनी चतुर्वेदिंचा परिचय करून दिला.
' पाहुणे भारतातील मोठे पंडित आहेत.
ते चारही वेदांचे जाणकार असल्यामुळे,
त्यांचे नावच मुळी चतुर्वेदी असे पडले आहे. '
चतुर्वेदी उभे राहिले, ' समोरील संस्कृत जाणकारांना इंग्रजीतून संबोधित करीत ते म्हणाले.
' मला संस्कृत भाषेविषयी काहीच माहित नाही.
मी तिला मृत भाषा मानतो. '
काहीतरी थातूर मातुर बोलत ते खाली बसले.
कार्यकर्त्यांना गफलत लक्षात आली.
पाहुण्यांचा अपमान न करता त्यांनी एक केले.
ताबडतोप परतीच्या विमानाचे तिकीट त्यांच्या हाती दिले.
No comments:
Post a Comment