१५१ गरुडाचे मतदान
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे हि. हिमालयातील प्रसिद्ध मानसरोवर काठची.
मानसरोवरात काही राजहंस राहत होते. ऋषीची सामगायने ऐकावी,
पक्षांचा कलरव प्राशन करावा, नीरक्षीर विवेक बाळगीत आनंदाने कालक्रमणा करावी.
एके दिवशी त्या सरोवरात एक कावळ्यांचा झुंड आला. कावळेच ते,
आपल्या कलकलाटाने त्यांनी त्या सरोवराची शांती भंग केली.
कावकाव, सगळीकडे घाण, अस्वच्छता . हंसांना आला राग.
त्यांनी कावळ्यांना ती जागा सोडून जायला सांगितले.
कावळे ऐकायला तयार होईनात . ते लोकशाहीची भाषा करायला लागले.
मतदानाची भाषा बोलू लागले.
झाले मतदानाचा दिवस उजाडला.एक एक पक्षी एक एक पान आणून टाकू लागला.
निकाल ठरलेलाच होता. कावळ्यांची पाने जास्त झाली.
राजहंस दुखी अंतःकरणाने आपले पिढ्या पिढ्यांचे मानसरोवर सोडून निघाले.
वाटेत त्यांना गरुड भेटला. हंस दुखी पाहून गरुडाने चौकशी केली.
हंसांनी सगळी हकीकत सांगितली. गरुड म्हणाला या कावळ्यांची अशी हिम्मत.
चला सगळे. गरुड हंसांना घेऊन पुन्हा मानसरोवराकाठी आला.
तो कर्णकर्कश गोंगाट ऐकून गरुड चिडला. त्याने एकच गर्जना केली.
मग काय, कावळ्यांचा वरचा श्वास वरच राहिला. जीवाच्या आकांताने जे ते
पळाले ते पुन्हा तिथे न येण्यासाठीच.
No comments:
Post a Comment