१५३ सूर्य तुर्की भाषेत उजाडला
तुर्कस्थान तेव्हा नुकताच स्वतंत्र बनला होता.
केमाल पाशाचा पराक्रम होता तो.
एके दिवशी त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली.
तो म्हणाला, ' आपल्याला राष्ट्रभाषा या विषयावर निर्णय घ्यायचा आहे.
सरकार, कायदा, शिक्षण विषयक पुस्तके तुर्की भाषेत आणायची आहेत.
भाषांतर करायला तुम्हाला किती वेळ लागेल ? '
अधिकाऱ्यांनी उत्तर दिले, ' पूर्ण दोन वर्षे लागतील. '
केमाल पाशांनी एक दीर्घ श्वास घेतला.
उपस्थितांवर आपली नजर रोखली.
' आज रात्री बारा वाजता तुमची दोन वर्षे पूर्ण होतील. ' ते म्हणाले.
दुसऱ्या दिवशी तुर्कस्थानचा सूर्य तुर्की भाषेत उजाडला !
No comments:
Post a Comment