कथा विवेकानंद - १११
स्वामी विवेकानंदांचे काही बालमित्र तारुण्यात पाय टाकताच वाईट मार्गाला लागले होते . चुकीच्या गोष्टी करण्यासाठी वाईट मार्गाने पैसा मिळवत होते . आपल्यासारखे इतरांनाही त्या मार्गात चलाखीने ओढत होते .
अशीच एक संध्याकाळ . नरेंद्र परिस्थितीने गांजलेला . मित्रांनी त्याला एका बागेत नेले . कोलकात्याच्या बाहेरील एका निवांत जागी असलेली भलीमोठी बाग . गाणे, बजावणे, नाचणे सुरु झाले . धुंदी, बेहोशी पसरू लागली .
थोड्या वेळाने नरेंद्र कंटाळला . मित्रांनी त्याला मागच्या खोलीत जाऊन आराम करायला सांगितले . तो खोलीत गेला आणि ताणून दिली .
एका वेगळ्याच आवाजाने नरेंद्र जागा झाला . त्याच्या जवळ एक युवती उभी होती . तिला मित्रांनीच पाठविले होते . नरेंद्र जागा झाल्याबरोबर तिने आपले मोहपाश टाकायला, आपला हेतू उघड करायला सुरुवात केली . नरेंद्र बधत नाही हे पाहून ती अंगचटीला यायला लागली .
नरेंद्र एकदम उठला . कडक शब्दात तो तिला म्हणाला, ' माफ करा . मला आता जायलाच हवे . असे आयुष्य घालविणे हे पाप आहे . हा मार्ग सोडून दे . परमेश्वर आपले भले करो . '