Friday, August 2, 2013

९६ . संवेदनशीलता

                    कथा विवेकानंद - ९६ 

     स्वामी विवेकानंदांनी संन्यास स्वीकारला . ते आश्रमात राहू लागले . मात्र त्यांनी आपली संवेदनशीलता जपली होती . अनेकांना त्यांच्या या गोष्टीचे आश्चर्य वाटे . 
     एकदा त्यांच्या काही नातेवाईकांचा मृत्यू झाला . स्वमिजींना हि बातमी समजली . बातमी ऐकताच ते रडू लागले . संन्याशी असूनही ते रडतात हे बघितल्यावर एकाने उद्गार काढले, ' संन्याशाने असा शोक करणे बरोबर नव्हे . ' 
     स्वामीजी म्हणाले, ' असे कसे ? मला मन नाही काय ? मी मन मारून टाकू काय ? उलट मला वाटते संन्याशी सामान्य माणसापेक्षा अधिक हळुवार मनाचा असला पाहिजे . संवेदनशील असला पाहिजे . मन दगडापेक्षा कठोर करणारा संन्यास धर्म मी अजिबात मानीत नाही . ' 


No comments:

Post a Comment