कथा विवेकानंद - ९५
स्वामीजी आजारी होते . आपला अंतिम समय जवळ आला आहे हे त्यांना समजले होते . पण सर्वांच्या इच्छेखातर त्यांनी डॉक्टरी उपचारांना अनुमती दिली होती .
शिष्यांनी प्रसिद्ध वैद्य सेनगुप्ता यांना बोलाविले . त्यांनी स्वामीजींची नाडीपरीक्षा केली . तपासणी केली आणि कठीण पथ्य सांगितले . ' पाणी व मीठ वर्ज्य . २१ दिवस '
स्वामीजींना मसालेदार पदार्थ आवडत असत . ते तंबाखू खायचे . दिवस उन्हाळ्याचे . पथ्य पार कसे पडायचे ? स्वामीजींनी पथ्य पाळायचे ठरविले . पुढे एकदा बोलताना स्वामीजी म्हणाले, ' वास्तविक मनाने शरीराला हुकुम केले पाहिजेत . पण अनेकदा होते उलटेच . शरीरच मनाला हुकुम सोडते . आणि मन तो मानते . मी मात्र शरीराला बजावले . तू पथ्य पाळायचे . आणि मजा म्हणजे शरीराने ती आज्ञा मानली . '
या क्षणी स्वामीजींच्या शरीरात ३३ रोगांचा निवास होता .

No comments:
Post a Comment