Thursday, August 8, 2013

१०१. सोळाएक रोट्या फस्त !

                    कथा विवेकानंद - १०१ 

     नरेंद्रच्या घरी सुबत्ता होती . समवेत मनाचा मोठेपणा होता . भुवनेश्वरीदेवी सढळ हस्ते खर्च करीत असत . पाहुण्यांचा मोठा राबता असलेल्या त्या घराचा खर्चही आज बघितले तर डोळे दिपविणारा ठरतो . 
     त्या काळी स्वस्ताई होती . साधारण माणसाचा पगार तेव्हा पंधरा रुपये महिना असे . अशा वेळी भुवनेश्वरीदेवीचा खर्च महिन्याला एक हजार रुपये होत असे असे . 
     नरेंद्र आणि महेंद्र दोघेही भाऊ मटणाच्या दुकानात गेले . त्या काळी दुकानात डोक्यांची विक्री केली जात नसे . दोघांच्याही डोक्यात एक विचार आला . विनाविलंब त्यांनी तो अमलातही आणला . ते दुकानदाराला म्हणाले, ' दोनचार आण्यात दहाबारा डोकी देशील काय ? ' दुकानदार एका पायावर तयार झाला . 
     दुसऱ्या दिवसापासून घरात रोज अडीच शेर वाटणा भिजू लागला . तो वाटणा आणि दहाबारा डोकी यांची भाजी . शाळेतून यायचे ते थेट भाजीला भिडायचे . उठायचे तेव्हा सोळाएक रोट्या फस्त झालेल्या असायच्या . 

No comments:

Post a Comment