Saturday, August 10, 2013

१०५. मी केस कापणार नाही .

                       कथा विवेकानंद - १०५

     स्वामी विवेकानंदांचा जन्म खानदानी बंगाली कुटुंबात झाला . घरी लक्ष्मी पाणी भरत होती . त्या काळी प्रतिष्ठित माणसे केस कापायला, दाढी करायला न्हाव्याकडे जात नसत . न्हावी त्यांच्या घरी येत असे . बंगालात त्या काळी ती प्रथा होती . 
     स्वामीजी संन्याशी बनले . मग पुढे आपली दाढी आपणच करायची सवय त्यांनी लावून घेतली . आश्रमात ते आपल्या हातानी दाढी करीत . आणि त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हि दाढी ते आरसा न वापरता करीत असत . आरसा वापरूनही आपला चेहरा कापून घेणाऱ्याना आज हे आश्चर्य वाटेल . 
      स्वामीजी अमेरिकेत गेले . दाढी भरपूर वाढलेली . ती कापून घ्यावी म्हणून ते एका सलूनमध्ये शिरले . आपली पाळी आल्यावर त्यांनी  न्हाव्याला दाढी कापायला सांगितले . न्हाव्याने चक्क नकार दिला . ' मी काळ्या माणसाचे केस कापणार नाही . ' तो म्हणाला . वर्णद्वेषाने काळवंडलेल्या त्या अमेरिकेतील त्याचे पुढचे विधान होते . ' मी तुमचे केस कापले तर नंतर एकही अमेरिकन या दुकानात पाय ठेवणार नाही . ' 

No comments:

Post a Comment