Friday, August 23, 2013

११०. परमेश्वराचा धावा कर .

                     कथा विवेकानंद - ११०

     इंद्रियनिग्रह हा साधुत्वाचा एक प्रमुख गुणधर्म आहे . संन्यास धर्माची दिनचर्या पाळणे तसे बरेच कठीण . हे नियम यती ब्रह्मचर्याच्या जोरावर पाळत असतो . आपल्या बहिर्मुखी इंद्रियांना अंतर्मुखी करीत त्यांवर विजय मिळवीत असतो . 
     नरेंद्र व मित्र बसले होते.  ग़प्पा चालल्या होत्या . एकाने फिरायला जायची टुम काढली . सगळे फिरायला निघाले . त्या मित्राने सगळ्यांना एका विशिष्ट जागी नेले . त्या ठिकाणी पूर्वी ठरल्याप्रमाणे एक सुंदर स्त्री आली . ती नरेंद्र बरोबर बोलू लागली . मित्र एकएक करून काढता पाय घेऊ लागले . 
     ती स्त्री नरेंद्राला म्हणाली, ' तुझ्या कुटुंबाची झालेली अन्नान्न दशा मला बघवत नाही . तू माझा स्वीकार करावास . मी माझी सगळी संपत्ती तुला देत आहे . आपली पत्नी म्हणून माझा स्वीकार कर . '
     ' बालिके, तू  इतके दिवस या देहासाठी खूप काही केलेस . पुरे ते आता . काही दिवसांनी तू मरणाला सामोरी जाणार आहेस . त्यानंतरच्या प्रवासासाठी काही तरतूद केली आहेस का ? चल, आता हा क्षुल्लक विचार बंद कर आणि परमेश्वराचा धावा कर . ' 



No comments:

Post a Comment