कथा विवेकानंद - १०३
नरेंद्राला मोठ्या बहिणी दोन . हारामणी व स्वर्णमणी . मोठ्या बहिणी असणे यासारखे दुसरे सुख नाही . घरातल्या कोणत्याही कामाची चिंता नाही आणि चिडवायला जिवंत खेळणे हाताशी . नरेंद्राची चंगळ असे .
नरेंद्र सातत्याने या बहिणींची खोड्या काढी . इतक्या, कि त्या वैतागून जात . नरेंद्राला पकडायला धावत . नरेंद्र मग सुसाट धावत सुटे . पळापळीचा खेळ बराच वेळ झाला, बहिणी थकल्या कि मग तो आतल्या खोलीत पळे .
त्या खोलीत बरेच अडगळीचे समान पडलेले असे . त्या सामानाच्या आत खोलवर शिरे . तिथून मग बहिणींना वाकुल्या दाखवी आणि आह्वान देई . ' या आणि पकडून दाखवा . ' नरेंद्राला पकडणे शक्य नसे . त्या चिडत. हा मग गोड आवाज काढी आणि पुन्हा म्हणे, ' याना आणि पकडून दाखवा ना . '

No comments:
Post a Comment