Friday, August 9, 2013

१०२. किटली शुद्ध रुप्याची !

                     कथा विवेकानंद - १०२ 

      विद्यमान भारताच्या उत्थानाची बीजे स्वामी विवेकानंदांनी आपल्या  हयातीत लावली . अज्ञानाच्या गर्तेत खोल खोल बुडत चाललेल्या भारताला पुनरुत्थानाच्या दिशेने कार्यरत केले . 
     स्वामी विवेकानंदांनी मोठेपणी ज्या ज्या गोष्टींना हात लावला त्या गोष्टींचे सोने केले . मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात . त्याचे असे झाले . 
     नरेंद्र आणि दादा म्हणजे भाऊ फिरायला गेले . बाजारात फिरता फिरता एके ठिकाणी त्यांना पावणी चाललेली दिसली . पावणी बघत ते उभे राहिले . एका किटलीची बोली सुरु झाली . काळपट रंगाची, धूळ साचलेली पण सुंदर आकाराची किटली . नरेंद्रने ती घ्यायची ठरविली आणि बोली लावली . पाच आण्यावर बोली तुटली अन किटली नरेंद्राची झाली . 
     घरी आल्यावर नरेंद्र किटली साफ करू लागला . जसजशी किटली साफ होऊ लागली तसतशी ती चमकू लागली . रुपेरी रंग फेकू लागली . नरेंद्रने आईला बोलाविले . पाच आण्यात नरेंद्रने आणलेली ती किटली शुद्ध रुप्याची, चांदीची होती . 

No comments:

Post a Comment