Saturday, August 3, 2013

९७ . आद्य शंकराचार्यही मातृभक्त होते .

                        कथा विवेकानंद - ९७ 

     स्वामी विवेकानंद मातृभक्त होते . ते आपली आई भुवनेश्वरीदेवीवर   निरतिशय प्रेम करायचे . नरेंद्र संन्याशी झाला . संन्याशी होणे म्हणजे सगळे भौतिक संबंध तोडून टाकणे. स्वतः चे श्राद्धही स्वतः करणे .  संन्याशी झाल्यावर आपली हि मातृभक्ती त्यांनी लपवून ठेवली नाही . अनेक वेळा ती समाजाने पहिली .  
     दत्तांचे कुटुंब मोठे आणि सुखवस्तू कुटुंब होते . खाण्यापिण्याची सुबत्ता असलेल्या या कुटुंबात पाहुण्यांचा भलामोठा राबिता होता . आल्यागेलेल्यांचा दीर्घ निवास त्या कुटुंबात होत असे . गप्पांचे, गाण्यांचे  फड रंगत . 
     विश्वनाथ दत्तांचे निधन झाले . संपत्तीचा झरा आटला . आणि संपूर्ण नातेवाईकांनी सुंबाल्या केले . छोटी छोटी मुले असलेल्या भुवनेश्वरी देवींना पाण्याचा घोटही कोणी विचारला नाही . तिने स्वतःच्या हिकमतीवर मुलांना लहानाचे मोठे केले . 
     स्वामीजी आश्रमात होते . आश्रमात भुवनेश्वरीदेवी आल्या . आल्या आल्या खालूनच तिने स्वामीजींना हाक मारली . ' बिले ! ओ बिले ! ' स्वामीजी धावत खाली आले . आईशी हळू आवाजात बोलू लागले . सगळ्यांना आश्चर्य वाटले . काहींनी स्वामीजींना विचारलेही . ते म्हणाले, ' अरे, जन्मदात्री आई आहे ती माझी . आणि मीच काय, आद्य शंकराचार्यही मातृभक्त होते . ' 

No comments:

Post a Comment