Monday, August 19, 2013

१०९. व्यसने मित्रपरीक्षा

                           कथा विवेकानंद - १०९

     नरेंद्र सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता . घरी लक्ष्मी पाणी भरत होती . वडिलांचे निधन झाले आणि भुवनेश्वरीदेवींच्या संसाराला जणू कुणाची दृष्टच लागली . महिन्याला एक हजार रुपये त्या काळी खर्च करणारी आई अन्नाला महाग झाली . 
     नरेंद्रचे घर सुखवस्तू असल्यामुळे साहजिकच त्याचे अनेक मित्र श्रीमंत होते . पण त्यांनी कधी नरेंद्रच्या घरची चौकशी केली नाही . तो खातो काय, पितो काय ? घरी कोण कमवत असेल ? काहीच चौकशी केली नाही. 
     एके दिवशी गप्पाटप्पा झाल्या.  नेहमीप्रमाणे सगळे जायला निघाले . दोघे मित्र मात्र मागे रेंगाळू लागले . नरेंद्रच्या आसपास घुटमळू लागले . बाकीचे निघून जाताच त्यांनी नरेंद्राला विचारले, ' बिलू , आज तोंड उतरलेले का ? आजारी आहेस का ? '
      नरेंद्र म्हणाला, ' नाही रे ! ' 
     ' मग जेवलाबिवला नाहीस का ? ' मित्रांनी म्हटले . 
     नरेंद्र गप्प राहिला . 
     मित्रच ते . त्यांनी दुसरीकडे गपचुप चौकशी केली . नरेंद्रच्या घरची माहिती काढली . काही दिवसानीच भुवनेश्वरीदेवींना काही पैसे निनावी मिळाले . व्यसने मित्रपरीक्षा म्हणतात न ती हीच . 


No comments:

Post a Comment