कथा विवेकानंद - १०७
नरेंद्रच्या वडिलांचे निधन झाले . आय बंद पडली . खायचे काय ? असा प्रश्न निर्माण झाला . दिवसभर हादडून गप्पाष्टकात मग्न असलेल्या आप्तेष्टांनी विनाविलंब घर सोडले . छोटी कच्ची बच्ची असलेल्या भुवनेश्वरीदेविंकडे सगळ्यांनी पाठ फिरविली . ज्यांची देण्याची ऐपत होती त्यांनीही पाठ करणेच पसंत केले .
नरेंद्र नोकरीसाठी फिरायला लागला . सगळीकडे नकारघंटा . नोकरी मिळाली तर ती मनपसंत नसे . उन्हात फिरून फिरून पायाला फोड आले . खूप दमलेला असताना विश्रांतीसाठी सावलीत पडलेला असताना दोन मित्र जवळ आले . नरेंद्राची स्थिती बघून देवाचे भजन गायला लागले . गीताचा सारांश होता, ' देवाच्या प्रत्येक श्वासातून कृपेचे मेघ वहात आहेत .
नरेंद्र रागाने म्हणाला, ' गप्प बस ! तुझा जीव भुकेने कासावीस झाला आहे काय ? अरे, पोटभर अन्न खाऊन, चांगले कपडेलत्ते घालून, पंख्याचा वर खाणाऱ्यासाठी ही गोड कल्पना आहे . कधीकाळी ही कल्पना मलाही गोड वाटली होती . आज मात्र क्रूर थट्टा वाटत आहे . '

No comments:
Post a Comment