कथा विवेकानंद - १०६
नरेंद्र लहानपणी अत्यंत खोडकर होता . विविध प्रकारचे प्रयोग तो करून पहात असे . मनाला पटलेली गोष्ट तो बिनदिक्कत करीत असे . निधडेपणा हा त्याचा गुणविशेष होता .
नरेंद्राची आई कट्टर वैष्णव . घरी तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्न मिळत नसे . जेवण पूर्ण शाकाहारी . कांदा वर्ज्य . फुलकोबी सारखी भाजीही घरात शिजत नसे . कारण ती विदेशी आहे . काही प्रसंगी शेण सुद्धा खावे लागत असे .
आई व भावंडे नातेवाईकांकडे चालली होती . गप्पागोष्टी, चिडवाचिडवी, मजा करीत त्यांचा प्रवास चालू होता . दुपार झाली . एका नातेवाईकाकडे ती थांबली . त्या दिवशी त्या घरी मस्त मांसाहारी बेत होता . चुलीवर मांस रटरटत होते .
नरेंद्र मांस हादडत असे . त्या दिवशी तर त्याची चंगळच होती . मुले जेवायला बसली . छोटा भाऊ महेंद्र जेवणाला स्पर्श करेना . मग काय ! नरेंद्राने बळजबरीने त्याचे तोंड उघडले . मांस तोंडात कोंबले नि पाठीत धुमके घालायला सुरुवात केली . धुमके थांबले मांस महेंद्रच्या पोटात गेले तेव्हा !

No comments:
Post a Comment