Saturday, August 10, 2013

१०४ . भजी खा ! भजी !

                       कथा विवेकानंद - १०४ 

     माणसाच्या शेवटच्या दिवसात त्याच्या बालपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या होतात . त्याला बालपणीच्या गोष्टी पुन्हा कराव्याश्या वाटतात . तसे तो करतोही . एके परीने अज्ञाताच्या दिशेने चाललेला तो त्याचा उलट प्रवासही असतो .   
     स्वामीजी त्या दिवसात मठात रहात होते . एके दिवशी मोठ्याने ते सर्वांना बोलावू लागले . ' अरे, चला बघू ! इकडे या ! मी जे जे साहित्य  सांगतो ते ते आणून द्या बघू ! बघता काय ? अरे आज मी भजी करणार आहे भजी ! आणा पाहू , डाळीचे पीठ, तेल, मीठ, कढई .... 
    स्वामीजींनी सांगितले ते सामान शिष्यांनी आणले . बसायला चौरंगही आणून दिला . स्वामीजी तयारीला लागले . आपली लुंगी त्यांनी गुडघ्यापर्यंत उचलून वर खोवली . चौरंगावर बैठक मारली . भज्यांच्या पिठाची ते तयारी करू लागले .  
     चळ चुळ, चळ चुळ आवाज येऊ लागला . फुलुरी तयार होऊ लागली . स्वामीजी लहान मुलासारखा मोठमोठ्याने आरडाओरडा करीत शिष्यांना बोलावू लागले . ' चला या , भजी खा ! गरमागरम भजी खा ताजी ताजी ! स्वामीजी तेव्हा अस्सल भजीवाल्यासारखे दिसत होते .  
      

No comments:

Post a Comment