कथा विवेकानंद - ९८
नरेंद्रच्या पणजोबांचे नाव राममोहन दत्त . ते सर्वोच्च्य न्यायालयात फारसी कायदेतज्ञ होते . धनसंपत्ती, जमीनजुमला यांनी ते संपन्न बनले . उन्हाळ्यात कोलकात्यात कॉलऱ्याची साथ येत असे . या साथीत वयाच्या केवळ छत्तीसाव्या वर्षी राममोहनांचा मृत्यू झाला .
त्यांच्या मुलाचे नाव दुर्गाप्रसाद . तेही अटर्नी कार्यालयात कामाला होते . त्या काळी जमीनजुमल्या वरून भांडणे खूप होत . कोलकात्यातील मोठमोठी घराणी कोर्टकचेरीच्या नादी लागून बरबाद होत असत .
एके दिवशी घरात दुर्गाप्रसादांच्या पत्नीचा अपमान झाला . दुर्गाप्रसादना त्याचा राग आला . त्यांनी घराचा त्याग केला . काही दिवसांनी त्यांनी संन्यास घेतला आणि योगी बनले . कधी कधी ते कोलकात्यात येतही असत . असेच एकदा आले असताना त्यांच्या खोलीला बाहेरून कुलूप लावण्यात आले . त्यांनी पुन्हा जाऊ नये असा सर्वांचा हेतू होता . तीन दिवसांनी बघितले तर त्याच्या तोंडातून फेस येत होता . दार उघडण्यात आले . ते निघून गेले ते पुन्हा आलेच नाहीत . नरेंद्रच्या संन्यासाचे मूळ आजोबा होते .

No comments:
Post a Comment