कथा विवेकानंद - १०८
दुपारची वेळ . सकाळीच बाहेर पडलेला नरेंद्र घरी परतला होता . नन्नाचा पाढा ऐकत . चपला झिजल्या होत्या . पायात पेटके आले होते . भूक तर सपाटून लागली होती . मात्र नोकरी कोणीही देत नव्हते . बहुतेक ठिकाणी शिक्षण जास्त म्हणून तर काही ठिकाणी गरज नाही म्हणून . नकारघंटा सतत वाजत होती .
नरेंद्राने स्वयंपाक घरात डोकावले . डब्याच्या तळाशी थोडेशेच तांदूळ दिसत होते . म्हणजे आजही सर्वांना अर्धपोटीच राहायचे होते . ओठांवर उसने हसू आणीत पोट भरलेले दाखवायचे होते .
नरेंद्रच तो . क्षणभर विचार केला त्याने . बस्स ! ' आई, ए आई ! 'त्याने आईला हाक मारली . भुवनेश्वरीदेवी धावत आल्या . नोकरी मिळाल्याची बातमी असेल कदाचित . त्या लगबगीने आल्या . नरेंद्र म्हणाला, ' आई, आज मी जेवायला नाही हा . तो माझा मित्र आहे ना ! त्याने आज जेवायला बोलाविले आहे . हा बघ निघालोच . '

No comments:
Post a Comment