Tuesday, August 6, 2013

९९ . बिलु शांत होत गेला .

                        कथा विवेकानंद - ९९

स्वामी विवेकानंदांच्या पणजीचे नाव राईमणिदेवी बसू . त्यांच्या मुलीचे म्हणजे नरेंद्रच्या आजीचे नाव रघुमणीदेवी . भुवनेश्वरीदेवी हे रघुमणीदेवी यांचे एकमेव अपत्य . 
     रघुमणीदेवी दिसायला सुंदर होत्या . तोच वारसा भुवनेश्वरीदेवीं कडून नरेंद्राला मिळाला . उन्नत भालप्रदेश, विशाल नेत्र आणि तेजस्वी कांती त्याला आई आजी कडून मिळाली . 
     मात्र गडगंज श्रीमंती लाभूनही भुवनेश्वरीदेवींना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या . म्हणून संन्याशी झाल्या नंतर सुद्धा स्वामी विवेकानंद आपल्या आईची काळजी करताना दिसतात. भुवनेश्वरीदेवींनीही नरेंद्राला म्हणजे तिच्या लाडक्या बिलुला लाडाकोडात वाढविलेले दिसते .      अत्यंत खोडकर असलेला बिलू एक दिवस कोणालाही ऐकेना . खूपच मस्ती करू लागला . आईने काय केले ठाऊक आहे ? विहिरीजवळ गेली. थंडगार पाण्याची कळशी भरली . आणि ओतून दिली एकदम बिलुच्या डोक्यावर . एकीकडे ती शिव शिव म्हणू लागली आणि दुसरीकडे बिलु  शांत होत गेला . 

No comments:

Post a Comment