कथा विवेकानंद - ६७
स्वामी विवेकानंद दीक्षा घेण्यासाठी आलेल्या युवकांना दीक्षा देत . पण त्यांनी मुक्तीचा मार्ग शोधणे स्वामीजींना आवडत नसे . समाज गलितगात्र असताना स्वतःची मुक्ती हे त्यांना स्वार्थी वाटे . आधी समाजाची ह्या अवनतीतून मुक्ती मग स्वतःसाठी असे त्यांचे सूत्र होते .
स्वामीजीकडून दोन तरुणांनी दीक्षा घेतली . त्यांची नावे ठेवण्यात आली विरजानंद आणि प्रकाशानंद ! यथावकाश स्वामीजींनी त्यांना ढाक्यास जायला सांगितले . स्वामी रामकृष्णाच्या शिकवणुकीचा प्रचार करण्यास सांगितले . ते का कुं करायला लागले .
' आम्हाला काहीच ज्ञान नाही. आम्ही काय सांगणार ? असे ते म्हणू लागले. आम्ही आणखी थोडी खडतर तपः श्चर्या करू . मुक्तीलाभ घेऊ. मग ढाक्यास जाणे योग्य होईल . '
स्वामीजी रागावले, " वत्सा, तू स्वतः च्या मुक्तीची धडपड केलीस तर नरकात जाशील . हि स्वार्थी इच्छा सोडून दे . जनसामान्यांच्या मुक्तीसाठी झोकून दे ! "